विना हेल्मेट पेट्रोन न दिल्याने चालकाला मारहाण
नाशिक – हेल्मेट नसल्यास स्वातंत्र्यदिनापासून पेट्रोल देण्यास नाशिक शहरात बंदी आहे. त्यातून दिंडोरी रोडवर इच्छामणी पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याला मारहाणीचा प्रकार उघडकीस आला. मिलींद विवेक कुलकर्णी (वय ३६, ऋषीराज हाईटस, महात्मानगर) यांच्या तक्रारीवरुन म्हसरुळ पोलिस ठाण्यात तिघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (ता.१८) सायंकाळी सव्वा सहाला दिंडोरी रोडवरील इच्छामणी पेट्रोलपंपावर तिघे जण विना हेल्मेट पेट्रोल भरण्यासाठी आले. त्यांना पंपावरील कर्मचारी ज्ञानेश्वर पोपट गायकवाड (वय २४, चाचडगाव ता.दिंडोरी) याने हेल्मेट नसल्याने पेट्रोल देण्यास नकार दिल्याने राग आलेल्या तिघांनी शिवीगाळ करीत एकाने रस्त्यालगत असलेला दगड उचलून मारला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी स्वता पंपावर भेट देउन विचारपूस केली.
हद्दपार संशयिताला सिडकोत अटक
नाशिक – शहर पोलिसांनी दोन वर्षासाठी हद्दपार केलेल्या ऋषीकेश अशोक राजगिरे (चुंचाळे शइवार ) याला पहाटे अटक केली आहे.
संशयित ऋषीकेश राजगिरे याला पोलिस उपायुक्तांनी १३ जानेवारी पासून शहरातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. असे असूनही
काल बुधवारी (ता.१८) मध्यरात्री एकच्या सुमारास तो चुंचाळे येथील घरकूल योजनेत असल्याची माहीती मिळाल्याने पोलिसांनी
त्याच्या घराची झडती घेतली असता तो घरीच सापडला याप्रकरणी पोलिस शिपाई हेमंत रमाकांत आहेर यांच्या तक्रारीवरुन अंबड
पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.