नाशिक : शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून,वेगवेगळ्या भागात पार्क केलेल्या पाच मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी पंचवटी, गंगापूर, भद्रकाली, सातपूर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून वाहनचोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. तपोवनरोडवरील अनुसया नगर भागात राहणारे दिपक हिरामण काश्मिरे (रा.रविराज एम्पायर) यांची मोटारसायकल एमएच १५ डीसी १९६७ गेल्या गुरूवारी (दि.१२) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार भोज करीत आहेत. दुसरी घटना दिंडोरीनाका भागात घडली. गणेश नारायण काजळकर (रा.नंदकुमार सोसा.दिंडोरीनाका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. काजळकर यांची पॅशन प्रो एमएच ४१ झेड ९७७५ मोटारसायकल गेल्या मंगळवारी (दि.३) त्यांच्या इमारती समोर उभी केलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार धिवर करीत आहेत. बापूराव रामदास पवार (रा.जिजामाता कॉलनी रोड,शिवाजीनगर) यांची स्प्लेंडर एमएच १५ जीएस २०७४ गेल्या रविवारी (दि.१५) त्यांच्या पदमालया सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक सोळसे करीत आहेत. नवनाथ माधव काकड (रा.श्री गणेश विश्व अपा.भैरवी कॉलनी) यांची जीजे १५ सिजे ६११३ ही मोटारसायकल गेल्या शनिवारी (दि.७) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत. तर जयभवानीरोड भागात राहणारे प्रकाश सिताराम मालुंजकर (रा.लौटे नगर) हे रविवारी (दि.१५) एकलहरारोड भागात गेले होते. पल्लवी हॉटेलच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली शाईन एमएच १५ सीजी ३३९६ पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चिखले करीत आहेत.