नाशिक : इमारतीच्या जीन्यात २३ वर्षीय विवाहीतेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चुंचाळे शिवारातील दत्तनगर भागात घडली. विवाहीतेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सपना सुनिल वसावे (रा.प्लॉट नं.३७ दत्तनगर) असे आत्महत्या करणा-या विवाहीतेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सपना वसावे यांनी सोमवारी (दि.१६) अज्ञात कारणातून आपल्या इमारतीच्या जीन्यातील लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. हा प्रकार निदर्शनास येताच शेजारी धनेश सरोदे यांनी पोलीसांना खबर दिली असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
चौथ्या मजल्यावरील गॅलरीतून पडल्याने १८ वर्षीय तरूणीचा मृत्यु
नाशिक : चौथ्या मजल्यावरील गॅलरीतून पडल्याने १८ वर्षीय तरूणीचा मृत्यु झाला. ही घटना पाथर्डी फाटा भागातील ज्ञानेश्वर नगर भागात घडली. कपडे वाळत टाकत असतांना ही दुर्घटना घडली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. यशोदा भैरू शिंदे (रा.गणेशपार्क, दत्तमंदिरामागे) असे गॅलरीतून पडल्याने मृत्यु झालेल्या तरूणीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार यशोदा शिंदे ही तरूणी सोमवारी (दि.१६) सायंकाळच्या सुमारास चौथ्या मजल्यावरील आपल्या राहत्या घराच्या गॅलेरीत कपडे वाळत टाकत होती. पावसाच्या पाण्यमुळे पाय घसरल्याने ते इमारतीवरून खाली कोसळली. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी तिला तात्काळ नजीकच्या सप्तशृंगी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार सुरेश भोजणे करीत आहेत.