मायलेकींची आत्महत्या मृत महिलेवर गुन्हा
नाशिक : सासरच्या छळास कंटाळून मायलेकींनी आत्महत्या केल्याची घटना पाथर्डी शिवारात घडली. या घटनेत विवाहितेने सहा महिन्यांच्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेतली होती. याप्रकरणी जन्मदाती माते विरूध्द आपल्या मुलीचा खुन केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सविता शरद सोनवणे (२६ रा.पांडवनगरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मृत महिलेचे नाव आहे. सविता सोनवणे या विवाहीतेने ८ एप्रिल रोजी सासरच्या छळास कंटाळून आपल्या सहा महिन्याच्या शरण्या सोनवणे या चिमुकलीस सोबत घेवून पाथर्डी शिवारातील जाधव मळा भागातील विहिरीत उडी घेतली होती. या घटनेत मायलेकींचा मृत्यु झाला होता. सहाय्यक निरीक्षक निखील बोंडे यांच्या तक्रारीवरून मुलीचा नाहक जीव घेतल्याप्रकरणी मृत जन्मदाती विरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक माईनकर करीत आहेत.
……
उंटवाडीत एकाची आत्महत्या
नाशिक : उंटवाडी भागात राहणा-या ४१ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पिंटू सुभाष बेंडकुळे असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. बेंडकुळे यांनी मंगळवारी (दि.४) सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला सााडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
……