प्रताप चौकात झालेल्या घरफोडीत पावणे तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
नाशिक : सिडकोतील महाराणा प्रताप चौकात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ७८ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्याचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छगन बापू भोजणे (रा.महाराणा प्रताप चौक,सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. भोजणे कुटूंबिय गुरूवारी (दि.१२) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजा कश्याने तरी उघडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ७८ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बेंडवाल करीत आहेत.
……
जुगार खेळविणा-यास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक : फनरेप अॅपवर ऑनलाईन जुगार खेळविणा-यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीत रौलट नावाचा जुगार खेळण्यास अनेकांना प्रवृत्त करीत होता. त्याच्या ताब्यातून मोबाईलसह रोकड असा सुमारे २१ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रितम राजेंद्र गोसावी (३४ रा.पिंपळगाव ब.ता.निफाड) असे अटक केलेल्या जुगारीचे नाव आहे. शुक्रवारी (दि.१३) रात्री संशयीत उपनगर नाका भागात जुगार खेळवितांना मिळवून आला. स्व:ताच्या फायद्यासाठी तो मोबाईलवरील फनरेप नावाच्या अॅपवर ऑनलाईन रौलेट जुगार खेण्यासाठी अनेकांना प्रवृत्त करीत होता. पैश्यांच्या मोबदल्यात आयडी व पासवर्ड देवून पैसे देवून तो रौलट जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आला. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश भागवत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.
….