बोधलेनगर परिसरात स्प्रिंग व्हॅली सोसायटीत पावने पाच लाखांची घरफोडी
नाशिक – नाशिक पुणे महामार्गावरील बोधलेनगर परिसरात स्प्रिंग व्हॅली सोसायटीत बंद घराची घरफोडी करीत ४ लाख ७९ हजाराची घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. शैलजा विश्वजित भोईर (वय ४५, स्पिंगव्हॅली (शिवसृष्ट्री), बोधलेनगर तपोवन रोड) यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी (ता.१०) नउच्या सुमारास चोरट्यांनी राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचा कोंयडा तोडून घरात प्रवेश करीत, बेडरुममध्ये लोखंडी कपाटाचे ड्रॉवरचे लॉकर तोडून कपाटातील २ लाख ३० हजाराच्या ५ तोळ्या सोन्याच्या बांगड्या, २ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, हिऱ्याच्या २ अंगठ्या, ९ ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, तीन चांदीचे पैंजन, दिड ग्रॅमची सोन्याची नथ, ३ चांदीचे क्वाईन, सुमारे सहा ग्रॅमचे सोन्याचे कानातले आणि १४ ग्रॅमचे सोन्याचे वेढे असा सुमारे ४ लाख ७९ हजाराचा ऐवज लंपास केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे तपास करीत आहे.
रिक्षा प्रवासा दरम्यान पाकीट चोरी
नाशिक – रिक्षाप्रवासा दरम्यान एकाचे पाकीट चोरुन चोरट्यांनी विविध महत्वाच्या ओळखपत्रांसह सुमारे १० हजाराचा ऐवज चोरला.
याप्रकरणी संदीप सुभाष पवार (वय ४०, पांडुरंग रेसीडेन्सी कुडूकरनगर, रवी शंकर मार्ग) यांच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री पवार मंगळवारी (ता.१०) सायंकाळी साडे पाचला सिव्हील हॉस्पीटल ते किटकॅट पॉईट दरम्यान रिक्षातून प्रवास करतांना रिक्षातील चौघा प्रवाशापैकी कुणीतरी १० हजार २८० रोकड कोर्ट फी स्टॅम्प, दहा रुपयांचे स्टॅम्प पेपर, मालेगाव नगरपालिकेचे ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्डाची कॉपी, वाहन चालविण्याचा परवाना, निवडणूक ओळखपत्र लंपास केले.
वेगवेगळ्या घटनात दोन दुचाकी चोरीला
नाशिक – शहरात दोन वेगवेगळ्या घटनात दुचाकी चोरीचे प्रकार घडकीस आले. याप्रकरणी पंचवटी आणि नाशिक रोड पोलिस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिल्या घटनेत दिंडोरी रोड वरील तारवालानगर परिसरातील गोकूळ सोसायटीतून मोपेड दुचाकी चोरुन नेली. दीपक बळवंत उपासनी (वय ५८, आदर्श गोकूळ सोसायटी, तारवालानगर दिंडोरी रोड) यांनी त्यांची मोपेड दुचाकी (एमएच १५ ईक्यु २६७४) आदर्श गोकूळ सोसायटीच्या पार्कींगमध्ये लावली असता चोरट्याने चोरु नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत नाशिक रोडला सुभाष रोड परिसरातील रिपोर्टे चाळीत युसूफ रझाक शेख (वय २८, यांनी त्यांची दुचाकी हिंरो होंडा (एमएच १५ एडब्लू २९७०) ही घरासमोर लावली असतांना चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.