फेसबुकवर पोस्ट; माथेफिरूने अश्लिल कमेंट करीत चारित्र्यावर उडविले शिंतोडे
नाशिक : फेसबुकवर आपल्या मुलीच्या फोटोसह पोस्ट टाकणे एका बापास चांगलेच महागात पडले आहे. माथेफिरूने अश्लिल कमेंट करीत मुलीसह तिच्या आईवर चारित्र्यावर शिंतोडे उडविले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पदमाकर कारे नामक संशयीत फेसबुक अकाऊंट धारकाचे नाव आहे. सातपूर औद्योगीक वसाहतीतील एका पित्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मुलीचा फोटो शेअर करीत पेट्रोल महागाई संदर्भात एक पोस्ट अपलोड करण्यात आली होती. या पेजवर अनेकांनी कमेंट केल्या. पदमाकर कारे नामक अकाऊंट धारकाने आक्षेपार्ह आणि अश्लिल कमेंट केली. या कमेंट मध्ये मायलेकींच्या चारित्र्यांवर तोंडसुख घेण्यात आले. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे करीत आहेत.
सामनगावला दोन गटात हाणामारी
नाशिक : सामगाव परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात धारदारशस्त्रांचा वापर करण्यात आल्याने दोन जण जखमी झाले आहेत. एका टोळक्याने घरात शिरून कुटूंबियावर हल्ला केला तर दुसºया घटनेत वाद मिटविल्याच्या कारणातून एकास कुºहाडीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात घुसून टोळक्याने धुडघूस घातल्याप्रकरणी याप्रकरणी अशोक दशरथ घेगडमल (५३ रा.सिध्दार्थनगर,सामनगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. नितीन उर्फ नन्या सुखदेव बागुल,संदिप सुखदेव बागुल,किरण बबन सोनवणे,दिनेश थोरा,किरण शांताराम बागुल,परश्या शांताराम बागुल (रा.सर्व सिध्दार्थनगर,सामनगाव) आदींच्या टोळक्याने रविवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरात शिरून मागील भांडणाची कुरापत काढून धुडघूस घातल्याचे म्हटले आहे. यावेळी संतप्त टोळक्याने घरातील सामानाची नासधुस करीत घेगडमल यांच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला केला. तसेच मदतीला धावून आलेल्या आई वडिलांसह मुलगी व भाचा यांना आमच्या नादाला लागू नका अशी दमदाटी करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर नितीन बागुल याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,शुभम जगताप,किरण जगताप,राजू घेगडमल,सागर घेगडमल (रा.सर्व सिध्दार्थनगर,एकलहरा गेट) आदींनी चुलत भाऊ किरण बागुल व राजू घेगडमल यांच्यातील वाद मिटविल्याने लाथाबुक्यांनी मारहाण करीत डोक्यात कुºहाड मारून जखमी केल्याचे म्हटले आहे. या घटनेत नितीन बागुल व किरण बागुल हे दोघे जखमी झाले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी आणि हवालदार महाले करीत आहेत.