नाशिक- पाथर्डी फाटा परिसरातील राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरूमचा दरवाजा बंद करून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या महिलेच्या बेडरुममध्ये साडेतीन वर्षाच्या मुलाचा देखील मृत्यूदेह घरात आढळून आल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान मुलाचा खून करून महिलेने आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान या घटनेत पोलीसांना महिलेच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट मिळाली आहे. पण, यात कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नसल्यामुळे ही आत्महत्या का केली असा प्रश्न चक्रावून टाकणार ठरला आहे. दरम्यान पोलिसांनी दोघेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिखा सागर पाठक वय (३२, रा साई सिद्धी अपार्टमेंट पाथर्डी फाटा) सोमवार या महिलेने त्यांच्या राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरूमचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधान ( तीन वर्षाचा) उशीने गळा दाबून खून केला असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, पोलिस उपआयुक्त विजय खरात, साहाय्यक आयुक्त सोहेल शेख घटनास्थळी त्वरित दाखल झाले.