तिडके कॉलनीत ६५ हजाराची घरफोडी
नाशिक – तिडके कॉलनीतील मातोश्री नगर परिसरात चोरट्याने घरफोडी करून ६५ हजार रुपयांचे दागिने व रोकड लंपास केली आहे. शशांक रामनाथ काळे (३७) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने शुक्रवारी (ता.६) तिडके कॉलनीतील मातोश्रीनगर भागातील सुषूश्रा अपार्टमेंट मध्ये प्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी घरफोडी करून घरातील ५ ग्रॅम वजनाचे दागिने व ५० हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातील पॅटमधील २२ हजार लांबविले
नाशिक – पाथर्डी फाटा परिसरातील नवले चाळीसमोरील नरहरी नगर येथे शनिवारी (ता.७) चोरट्याने सकाळी सातच्या सुमारास घराल अटकवलेल्या पॅटच्या शिखातून २२ हजार रुपये लांबिवले.बाहेरून लावलेली कडी काढून चोरट्याने घरातील अटकवलेल्या पॅटच्या खिशातून घरातील रोकड व मोबाइल चोरल्याची घटना पाथर्डी फाटा येथील नरहरी नगर परिसरात उघडकीस आला. संपत सर्जेराव उफाडे (४५) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने घराची कडी उघडून घरातील २ हजार रुपयांचा मोबाइल व २० हजार रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदेगावात एकाची आत्महत्या
नाशिक – शिंदेगाव परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. पल्लवी काळूदास बकुरे असे या तरुणीचे नाव आहे. पल्लवी हिने शनिवारी (ता.७) सायंकाळच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.