नाशिक – नाशिक पोलिस आयुक्तालय परिमंडळ १ कार्यक्षेत्रातील ८ सराईत गुन्हेगारांना तडीपार केल्याचे आदेश पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी पारीत केले आहे. या सर्वांवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ व ५६ प्रमाणे कारवाई करुन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
तडीपार केलेल्यामध्ये किरण दत्तात्रय शेळके (२७) रा. पंचवटी, याला एक वर्षासाठी, आकाश ओमप्रकाश साबळे (३६) विनयनगर याला दोन वर्षासाठी, रविद्र भरत वाघमारे (३७) गोल्फक्लब याला एक वर्षासाठी, समाधान उत्तम मुंढे, धनगर गल्ली, आडगाव याला एक वर्षासाठी, महेश दिलीप कर्पे, शुभम रमेश मोहिते, चेतन प्रभाकर खांडरे, रुषाल रमेश मोहीते, सर्व राहणार शांतीनगर मखमलाबाद रोड यांना सहा महिन्यासाठी हद्दपार केले आहे.