सॅनिटायझर पिऊन युवतीची आत्महत्या
नाशिकः बिटको रूग्णालयाच्या आवरातच सॅनिटायर पिऊन तसेच दोन्ही हातांवर मनगटाच्या नस कापून घेत युवतीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. शिवानी लक्ष्मण भुजबळ (२०, रा. आशेवाडी, ता. दिंडोरी, जि.नाशिक असे आत्महत्या करणार्या युवतीचे नाव आहे. ती उपचारासाठी बिटको रूग्णालयात
आली होती. या ठिकाणी रविवारी (दि.२) सकाळी तीने रूग्णालयाच्या आवारात ५०० मिलीची बाटलीतील सॅनीटायझर पिले होते. तसेच धारदार शस्त्राने दोन्ही हाताचे मनगटावर वार करून घेतले. यामुळे ती गंभीर जखमी झाल्याने अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कोकाटे करत आहेत.
….