जेल रोडला बारा लाखाची घरफोडी
नाशिक – जेल रोडला शिक्षक कॉलनी परिसरात बंद बंगल्यात घरफोडी करीत चोरट्यांनी सुमारे ११ लाखांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शकुंतला नारायण पाटील (वय ६४, आई बंगला, शिक्षक कॉलनी जेल रोड) यांच्या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. श्रीमती पाटील कुटुंबासह २९ जुलैला बाहेर गावी गेल्या होत्या. काल रविवारी (ता.१) दुपारी अडीचला घरी आल्यानंतर घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. त्यांच्या आई बंगल्यातील मुख्य दरवाजाच्या कडी कोयंडा उचकटवून घरात प्रवेश करीत घरातील बेडरुमचे दोन्ही लोखंडी कपाटातील लॉकर व कपाटात ठेवलेल्या लोखंडी पेटीतील २ लाख ५० हजाराची रोकड, १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, ८० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ४० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ८० ग्रॅम वजनाचे दोन चप्पलाहार, ४० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चेन, ३० ग्रॅमचे मंगळसूत्र, १० ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, २२ ग्रॅमच्या
सोन्याच्या तीन अंगठ्या, चांदीचे नाणे असा सुमारे ११ लाख ८५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक निरीक्षक शेळके तपास करीत आहे.
घरफोडीच्या तयारीत एकाला अटक
नाशिक- घरफोडीच्या तयारीत असलेल्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली. निलेश विजय येलमामे (वय ३२, दत्तमंदीराजवळ विडी कामगार नगर असे संशयिताचे नाव आहे. पंचवटी पोलिस ठाण्यातील नाईक अंबादास जगन्नाथ केदार (वय ३०) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी काल रविवारी (ता.१) मध्यरात्री दीडच्या सुमारास संशयित निलेश येलमामे हा पंचवटीतील अमृतधाम परिसरातील बाफना बाजार डिपार्टमेंटल
स्टोअर्सच्या शटर जवळ संशयास्पद घरफोडीच्या तयारीत असतांना पोलिस गस्ती दरम्यान आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
टकलेनगरला दुचाकीची चोरी
नाशिक – पंचवटीतील टकलेनगर परिसरात चोरट्यांनी बजाज डिस्कव्हरी दुचाकी चोरीला गेली. राजेश चंद्रकांत घोडके (वय ५०, झनकार अपार्टमेंट टकलेनगर) यांनी त्यांची दुचाकी बजाज डिस्कव्हर (एमएच १९ एएम ६३३७) ही दुचाकी त्यांच्या घराच्या पार्किगंमध्ये २६ जुलैला लावलेली असतांना चोरट्यांनी दुचाकी रात्रीतून चोरट्यांनी चोरुन नेली. पंचवटी पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
तडीपार संशयित जेरबंद
नाशिक – शहर पोलिसांनी फेब्रूवारी महिन्यात दोन वर्षासाठी शहर जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या संशयिताला काल रविवारी (ता.१) पेठ रोडला फुलेनगर परिसरातून पोलिसांनी अटक केली. सागर गणपत बोडके (वय २१, भरत पटेल गल्ली, फुलेनगर पंचवटी) असे हद्दपार केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात मारामाऱ्या खूनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगण्यासह पाच गुन्हे आहे. काल दुपारी साडे तीनला तो हद्दपार असूनही फुलेनगर परिसरात असल्याची माती मिळाल्यावर पंचवटी पोलिसांनी अटक केली.
–