मारहाणीला कंटाळून आत्महत्या
नाशिक – जेल रोडला दसक शिवारातील संत नरहरी नगर येथे पाच जणांच्या मारहाणीला कंटाळून एकाने आत्महत्या केली. गोकुळ विष्णु कदम (वय ३०, संत नरहरी नगर, दसक जेल रोड) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या आई लता विष्णु कदम यांच्या तक्रारीवरुन धनजंय निमसे, नांदूरनाका, अक्षय बावळे, जागृतीनगर, आकाश वाजे नरहरीनगर, संपत बोराडे, वैभव बोराडे, बोराडे मळा, राजराजेश्वरी मंगल कार्यालय जेल रोड यांच्या विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली महिती धनजंय निमसे याच्यासह पाच संशयितांनी मयत गोकुळ विष्णु कदम याला आर्थिक व्यवहारातून पैशाची मागणी करीत वारंवार मारहाण केल्याने गोकुळ याने त्याच्या राहत्या घरी पत्र्याच्या छताच्या लोखंडी ॲगलला दोरी बांधून गळफास घेउन आत्महत्या केली.
मारामारी सोडवतांना एकाला मारहाण
नाशिक – इंदिरानगरला रंगरेज मळ्यातील मोकळ्या मैदानावर मुलाची मारामारी सोडवायला गेलेल्या एकाला डोक्यात लाकडी दांडा मारुन जखमी करण्यात आले. जानकीराम जळबा बावऩे (वय ५२, श्रीरामनगर) यांच्या तक्रारीवरुन इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, काल शनिवारी (ता.३१) सायंकाळी साडे सहाला रंगरेज मळ्यातील मोकळ्या मैदानावर त्यांचा मुलगा व सुभम प्रकार गायकवाड (वय २४, रंगरेज मळा) यांच्यात मरामारी सुरु असतांना ते सोडवायला गेले असता, संशयित शुभम गायकवाड याने लाकडी दांड्याने डोक्यात मारहाण केली.
लॅम रोडला सौभाग्यनगरला घरफोडी
नाशिक – लॅम रोडला सौभाग्यनगर परिसरात घरफोडी होउन चोरट्यांनी १० हजाराचा ऐवज लंपास केला. राहूल विश्वनाश दास (वय ४०, सप्तगिरी लोकधारा सोसायटी ) यांच्या फ्लॅट बंद असतांना १७ ते २१ जुलै दरम्यान केव्हातरी चोरट्यांनी दास यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करीत घरातील लोखंडी कपाटातील लॉकर मधून १० हजाराची रोकड व एचपी कंपनीचा लॅपटॉप चोरुन नेला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.