कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
नाशिक – गंगापूर रोड भागातील पाईपलाईन रोड वरील नक्षत्र लॉन्स परिसरात कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. योगेश बाळू कांडेकर (वय ३९, वृंदावननगर ) असे जखमीचे नाव आहे. शुक्रवारी (ता.३०) रात्री सव्वा अकराच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी जखमीचे वडील बाळू दामू कांडेकर (वय ६६, रामरक्षा बंगला, वृदांवननगर यांच्या तक्रारीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात चार चाकी कार (एमएच ०१ बीसी ९९९०) हिच्या वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी कांडेकर यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांचा मुलगा जखमी योगेश हा सातपूर येथील क्रॅपिहस कंपनीतून त्याच्या होंडा शाईन (एमएच १५ सीपी ०२३१) हिच्यावरुन घरी जात असतांना भरधाव चार चाकी (एमएच ०१ बीसी ९९९०) हिने धडक दिल्या दुचाकीस्वार योगेश जखमी झाला.
शहरात दोन दुचाकी चोरीला
नाशिक – नांदूर मानूर परिसरातील हॉटेल वराड दणका ते तुळजा भवानी हॉटेल भागातून ललीत भगीरथ आवारे (वय २८, खेरवाडी ता.निफाड) यांची दुचाकी चोरीला गेली. तक्रारदार ललीत यांनी त्यांची दुचाकी हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच १५ डीई ८०६७) १९ जुलैला सायंकाळी सातला मानूर फाटा वराड दणका हॉटेल तुळजाभवानी जवळ लावली असता चोरट्याने चोरुन नेली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत सागर अनिल तिवारी (वय २८, हरिकृपा पाथर्डी फाटा) यांची ड्युटी स्कुटी (एमपी १२ एमआर ५८६३) २४ ते २५ जुला दरम्यान इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली स्कुटी चोरट्यांनी चोरुन नेली.
सराईतासह चौघांची एकाला मारहाण
नाशिक – नाशिक रोडला एकलहरे रोड वरील अरिंगळे मळ्यात सराईतासह दोघांनी एकाला कोयत्याने वार करीत जखमी केले. राजु बटवा बाबर (वय २४, अरिंगळे मळा) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या तक्रारीवरुन सराईत यश विनायक जाधव हुसेन फिरोज शेख याच्यासह इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. राजू बाबर याच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (ता.३०) रात्री नऊच्या सुमारास यश जाधव, हुसेश शेख यांच्यासह चौघांनी राजूच्या घऱात घुसून तु सागर कांबळे याच्यासोबत का राहतो असे म्हणत, त्याच्या खांद्यावर, दंडावर डाव्या हाता-पायावर कोयत्याने वार केले. त्याची पत्नी दुर्गा भांडण सोडवायला मध्ये पडली असता, तिला यश जाधव याने मारहाण करीत, पोलिसात तक्रार केली तर, जीवे मारण्याची धमकी दिली.