महिन्याला १५ हजार रुपये खंडणीची मागणी, एकाला अटक
नाशिक – पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात मंगळवारी दुपारी साडे तीनला प्रकाश लॉड्री येथे कोयता हातात घेत, सागर परदेशी याला दमबाजी करुन दर महिन्याला १५ हजार रुपये खंडणीची मागणी केली. या प्रकरणी खंडणी मागणा-या बापू सुभाष लकडे (आव्हाड चाळ क्रांतीनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित बापू लकडे हा सराईत असून त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवायासह सरकारवाडा आणि मालेगाव तालुका पोलीस ठाण्यातही गुन्हे आहेत.
दर महिन्याला पंधरा हजार रुपये खंडणी मागतांना लकडे याने शिवीगाळ करुन दमबाजी केली.या खंडणी प्रकरणाची सागर प्रकाश परदेशी (वय ३८, क्रांतीनगर मखमलाबाद रोड ) यांनी तक्रार केली. या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर परिसरात वेगवेगळ्या घटनेत चौघांची आत्महत्या
नाशिक – शहर परिसरात वेगवेगळ्या घटनेत चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. जेल रोडला राजराजेश्वरी मंगल कार्यालय परिसरातील एकाने गळफास घेउन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. पहिल्या घटनेत रत्ना नंदू सुर्वे (वय ३५, राजहंस अपार्टमेंट धात्रक फाटा ) या महिलेने बुधवार (ता.२८) अडीजच्या सुमारास राहत्या घरातील हॉलमध्ये छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेउन आत्महत्या केली. तर दुस-या घटनेत सिडको परिसरात घडली आहे. नीलेश सुरेश वाघ (वय ३५, रायगड चौक सिडको) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी (ता.२८) सायंकाळी साडे सातच्या सुमारास राहत्या घरी ओढणीने घराच्या छताच्या पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिस-या घटनेत गणेश व्यायाम शाळेजवळील घरात सचीन गणेश पवार (वय ३५) याने आत्महत्या केली आहे. मंगळवारी (ता.२७) रात्री साडे दहाच्या सुमारास त्याने घरातील माळ्याच्या लाकडाला टॉबेल बांधून गळफास घेतला. याप्रकरणी रविंद्र गुलाब ठाकूर यांच्या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. चौथ्या घटनेत पंचवटीतील धात्रक फाटा परिसरात वैष्णवी नितीन कर्पे (वय २३, स्वर्णप्रभा बंगला) हिने बुधवारी (ता.२८) पावने दोनच्या सुमारास राहत्या घरी घराच्या हॉलमध्ये लोखंडी जिन्याच्या रॅलींगला पिवळ्या रंगाच्या साडीने गळफास घेतला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.