प्रेमप्रकरणातून एकाची आत्महत्या
नाशिक : दीर भावजयच्या प्रेमप्रकरणातून एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सून आणि पुतण्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी येथील अरूणा भुतकर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कपिल सुरेश भुतकर (रा. आर्या हाईटस कडेपठार चौक,श्रमिकनगर) यांनी गेल्या मंगळवारी (दि.६) राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. सून आणि पुतण्या भागवत रामभाऊ भुतकर (रा.कोणार्कनगर) या दोघांच्या प्रेमप्रकरणा मुळे मुलगा कपिल याने आत्महत्या केल्याचे अरूणा भुतकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रेमप्रकरणास विरोध केल्याने दीर भावजाईने आपल्या मुलास मारहाण केली होती. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
घरात घुसून पतीपत्नीस मारहाण
नाशिक : घरात घुसून दोघा सराईतांनी पती पत्नीस बेदम मारहाण केल्याची घटना गुलाबवाडीतील मालधक्का भागात घडली. या घटनेत पतीवर कोयत्याने वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिध्दार्थ धनेधर (रा.फर्नांडीसवाडी) आणि आकाश श्रीवंत (रा.गुलाबवाडी) अशी दांम्पत्यास मारहाण करणा-या संशयीतांची नावे असून ते पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याप्रकरणी सोनू शब्बीर शेख (२७ रा.गुलाबवाडी,मालधक्का) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख दांम्पत्य मंगळवारी (दि.२७) सायंकाळी आपल्या घरात असतांना दोघा संशयीतांनी अनधिकृतपणे घरात प्रवेश केला. यावेळी आकाश श्रीवंत याने माझ्या सोबत राहिलेल्या महिलेसमवेत तू का राहतो या कारणातून दांम्पत्यास शिवीगाळ करीत दोघा संशयीतांनी दांम्पत्यास बेदम मारहाण केली. यावेळी श्रीवंत याने कमरेचा धारदार कोयता काढून पतीच्या डोक्यात वार केला. या घटनेत शेख जखमी झाले असून अधिक तपास जमादार ढगे करीत आहेत.