नाशिक – ग्राहकाच्या वादातून वडाळा नाका येथे एका चिकन विक्रेत्याने दुसऱ्या दोघा विक्रेत्या भावांवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात दोघे जण गंभीर जखमी आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी सीसीटीवी फुटेज ताब्यात घेतले. भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. सारडा सर्कल ते वडाळा नाका दरम्यान दोन चिकन व्यवसायिकांची शेजारी-शेजारी दुकान आहे. ग्राहकावरून दोघात काल रविवारी (दि.२५) वाद झाला. भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. आज सोमवारी (दि.२६) पून्हा त्यांच्यात पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून वाद उफाळून आला. संशयित इम्रान पठाण याने समीर अमन खान आणि मजहर अमन खान यांच्या दुकानात प्रवेश करत दोघा भावांवर कोयत्याने वार केला. दोघे गंभीर जखमी झाले. सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.घटनेने परिसरात तणावाचे वातावरण आहे. संशयित हल्ला करून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.