नाशिक – जुन्या भांडणातून दोन ठिकाणी मारामारीच्या घटना घडल्या आहे. एका घटनेत पाथर्डी फाट्यावर भारत डेअरी परिसरात एकाला मारहाण झाली तर दुस-या घटनेत नाशिक रोडला सिन्नरफाटा परिसरातील गणेशा व्हॅली परिसरातील स्वागत लॉन्स जवळ जून्या वादातून एकाला मारहाण झाली. पाथर्डी फाट्यावर झालेल्या मारहाणीत जफार अन्सारी हा जखमी झाला असून संशयित नवीनसिंग मनोजसिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नरगिस जफार अन्सारी (वय ३८, गौसिया मशीदजवळ वडाळागाव) यांच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जफार अन्सारी व मनोजसिंग यांच्यात जुना वाद होता त्यातून रविवारी (ता.२५) दुपारी साडे चारच्या सुमारास मनोजसिंग याने जफार याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन जखमी केले.
तर नाशिक रोडला सिन्नरफाटा परिसरातील गणेशा व्हॅली परिसरातील स्वागत लॉन्स जवळ जून्या वादातून एकाला मारहाण झाली. याप्रकरणी प्रशांत वामनराव खांदवे (वय ४२, एकलहरे रोड ) यांच्या तक्रारीवरुन आकाश विजय खर्जुल व सुनील खर्जुल यांच्यासह चौघा विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी दिलेली माहीती अशी शनिवारी (ता.२४) सायंकाळी पावने सहाला गणेशा व्हॅली परिसरातील स्वागत लॉन्स जवळ तक्रारदार प्रशांत वामनराव खांदवे त्यांच्या गॅरेजवर असतांना संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून गॅरेजमधील लोखंडी गजाने शिवीगाळ करीत धारदार शस्त्राने वार केल्याचा प्रकार घडला. नाशिक रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.