नाशिक – शहरात झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी ५ लाख ८५ हजाराचा ऐवज चोरुन नेला. एक घरफोडी नाशिक रोडला चेहेडी जकात नाका परिसरातील गोदापार्क अपार्टमेंट मध्ये झाली. या घरफोडीत ४ लाख ८९ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. तर पंचवटीतील खांडे मळ्यातील सिध्दी विनायक कॉलनीत झालेल्या दुस-या घरफोडीत चोरट्यांनी ९५ हजाराचा ऐवज चोरुन नेला आहे.
नाशिक रोडला च्या घरफोडीची तक्रार शरद सुकदेव दौंड (वय २९) यांनी दिली असून नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी दिलेली माहीती अशी फिर्यादी शरद सुकदेव दौंड (वय २९, गिता गोदापार्क) अपार्टमेंटमध्ये प्लॅट ११ मध्ये रहायला आहे. शनिवारी (ता.२४) रात्री आठच्या सुमारास इंडिगो कारमधून आलेल्या चौघा चोरट्यांनी बंद घराचा दरवाजाचा कोयंडा तोडून घरातील कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेल्या ३० ग्रॅम सोन्याचे गंठण, ३० ग्रॅमची सोन्याची पोत, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ५० ग्रॅमचे
चांदीचे ब्रासलेट, सोनाटा कंपनीचे घड्याळ, ॲसुस कंपनीचा लॅपटॉप, २ लाख ४० हजाराची रोख रक्कम, असा ६५ ग्रॅम सोन्यासह सुमारे ४ लाख ८९ हजाराचा ऐवज चोरुन नेला.
तर पंचवटीतील खांडे मळ्यातील सिध्दी विनायक कॉलनीत चोरट्यांनी रात्रीतून घरफोडी करीत, लाखाचा ऐवज लंपास केला. दिनेश मधुकर सुखात्मे (वय ६०,प्लॅट नंबर ७ सिध्दी विनायक कॉलनी) यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी काल रविवारी (ता.२५) रात्रीतून चोरट्यांनी फिर्यादी सुखात्मे यांच्या राहत्या घराचे बेडरुमच्या खिडकीचे गज कापून बेडरुममध्ये प्रवेश करीत बेडरुमच्या बिजागरी तोडून लोखंडी व लाकडी कपाटातील ३० ग्रॅमची सोन्याची चेन, सॅमसंगचा मोबाईल, चांदीचा कंबरपट्टा, छल्ला असा सुमारे ९५ हजाराचा एवज चोरुन नेला. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे तपास करीत आहे.