मैत्रीणीसोबत फेरफटका मारणाऱ्या महिलेचा दोघा अज्ञात व्यक्तींनी केला विनयभंग
नाशिक – मैत्रीणीसोबत फेरफटका मारणाऱ्या महिलेचा दोघा अज्ञात व्यक्तींनी विनयभंग केला. विनयनगर परिसरातील सुजता को. ऑप. हौसिंग सोसायटी परिसरात ही घटना घडली. या महिलेचा आरोपीने पाठलाग करुन एका ठिकाणी या महिलांना थांबवत त्यांना मला बोलायचे आहे, तू थांबली नाही तर मी रात्री घरी येईल अशी धमकी दिली. त्यानंतर या महिलेने घरी येऊन ही घटना सांगितली. त्यानंतर घरच्याबरोबर जाऊन महिलेने मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील तपास पीएसआय श्रीवंत करीत आहेत.
मालमत्तेच्या वादातून विवाहीतेचा छळ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी
नाशिक – मालमत्तेच्या वादातून विवाहीतेचा मानसिक व शारिरीक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत विवाहीतेच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पवन शरद पाटील, शांताबाई शरद पाटील, शरद चिंतामरण पाटील (रा. आरटीओ ऑफीसजवळ) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला. मालमत्ता विवाहितेला मिळू नये, यासाठी तिचा छळ ऑक्टोबर २०२० ते ९ जुलै २०२१ या कालावधीत करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. म्हसरूळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय चतूर करत आहेत.
तिघा अज्ञात व्यक्तींनी वॉचमनसह अन्य दोघांना बेदम मारहाण
नाशिक – तिघा अज्ञात व्यक्तींनी वॉचमनसह अन्य दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जय तेंडुलकर (२५, रा. गायत्रीनगर, हिरावाडी) याने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, पल्सरवर आलेल्या तिघांनी येथे गांजा कोठे मिळतो, तुम्ही कोणाचे नाव घेतले असे म्हणून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.