नाशिक – इंदिरानगर येथील वडाळा गावातील अण्णाभाऊ साठे नगर लगत एका पडक्या विहिरीत ३५ वयाचा अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे असे पोलिसांनी सांगितले. (दि. २४) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हिरामण साळवे शेतात गेले असता दुर्गंधी येत होती. त्यांनी विहिरीत बघितले असता मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.