चाकूचा धाकाने चौघांनी दुचाकीस्वाराला लुटले, दोन जणांना अटक
नाशिक – दिपालीनगर परिसरातील नारायणी हॉस्पीटल मार्गावर चौघांनी दुचाकीस्वाची लुट प्रकरणी मुंबई नाका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी माधव कारभारी वाघ (वय ३२, गंगाश्री रो हाउ सेंट लॉरेन्स हायस्कूलजवळ सिंहस्थनगर) यांनी तक्रार केल्यानंतर पोलीसांनी ही कारवाई केली आहे. फिर्यादी वाघ हे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास दिपालीनगर परिसरातील नारायणी हॉस्पीटलपासून त्यांच्या दुचाकीवरुन कच्या रस्त्याने जात असतांना संशयित सलमान अत्तार, मोईन पठाण यांच्यासह चौघांनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्याकडून विवो कंपनीचा मोबाईल व साडे तीन हजाराची रोकड तसेच कानातील बेनटेक्सची बाळी असा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. या प्रकरणात सलमान युसूफ अत्तार (वय २०, हिना अपार्टमेंट, मदिना ज्वेलर्स जवळ), मोईन सलीम खान पठाण (वय २०, वरिश मदरशाच्या बाजूला भारतनगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. इतर दोघांचा तपास सुरु आहे.
जुन्या नाशिकमधून मालट्रक चोरीला
नाशिक – जुन्या नाशिक परिसरातील डॉ. जाकीर हुसेन हॉस्पीटलसमोरुन चोरट्यांनी मालट्रक चोरुन नेल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या चोरीप्रकरणी शेख निजाम अब्दुल करीम (वय ४६, दाएद बिल्डिंग जुना कथडा, टाकळी रोड) यांनी तक्रार केली आहे. करीम यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मागील आठवड्यात १५ जुलैला रात्रीतून कधी तरी चोरट्याने महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयासमोर निवृत्ती कॉम्पेल्कसमोर लावलेला (एमएच १५ सीके ८२६५) हा एलपीटी मॉडेल चॉकलेटी रंगाचा ट्रक चोरुन नेला.
आडगावला स्पेअर पार्टच्या दुकानातून चोरी
नाशिक – आडगावला चोरट्यांनी स्पेअर पार्ट दुकानात घरफोडी करत पन्नास हजाराहून आधीकचा ऐवज चोरुन नेला.या चोरीच पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात ट्रक टर्मिनल समोर शेल पेट्रोलपंपा शेजारी फिर्यादी आशीश गुप्ता यांचे निककंठ ॲटो पार्टस हे स्पेअर पार्टचे दुकान आहे. बुधवारी (ता.२०) रात्रीतून कधी तरी चोरट्यांनी दुकानाच्या मागच्या बाजूचा पत्रा वाकवून दुकानात घुसून त्यातील केसीआय कंपनीचे १५ व्हील बेरिंग, टाटा एसव्हीएल काफिला १० जाईट क्रॉस, २ व्हिडॉल कंपनीचे आईलचे बॉक्स, जेएम कंपनीचे ३ स्प्रिंग पट्टे, सीके कंपनीचे ३ वॉटर पंप, ८ मेरी टोअर कंपनीचे ब्रेक रॅचिट, , १ आईल फिल्टर, १० स्प्रिंग बुश असा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी आशीश राकेश गुप्ता (वय ३१, ड्रिमसिटी समतानगर नाशिक) यांच्या तक्रारीवरुन आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.