मोबाईलवरून अश्लिल शिवीगाळ
नाशिक – मागणी केल्यानंतर उसणवारीत पैसे देण्यास नकार दिल्याने एका महिलेने दुसर्या महिलेस व तीच्या मुलीला मोबाईलवरून अश्लिल शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तीच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबनम उर्फ समीना गफुर मोमीन (२८, रा. कडेगाव, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचे नाव आहे.याप्रकरणी भद्रकाली परिसरातील महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पीडितेच्या पतीकडे सबंधीत महिलेने पैशांची मागणी केली होती. ते पैसे देण्यास नकार दिल्याने तीने मार्च ते १५ एप्रिल पर्यंत वेळोवळी मोबाईलद्वारे फोन करून पीडित महिला व तीच्या अल्पवयीन मुलीस अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक सोनवणे करत आहेत.
…….
मंगळसुत्र हिसकावले
नाशिक – भाजीपाला घेऊन पायी घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र समोरून आलेल्या दुचाकीस्वरांनी हिसकावून पळवल्याची घटना बुधवारी (दि.१५) पंचवटीतील हिरावाडी रोडवर घडली. याप्रकरणी हिराबाई कृष्णा चव्हाण (७२, रा. आपला महाराष्ट्र कॉलनी हिरावाडी रोड, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्या भाजीपाला खरेदी करून घराकडे परत येत असताना अचानक समोरून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील २० हजार रूपये किंमतीचे सोन्या चे मंगळसुत्र हिसकावून पळ काढला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक एस.सी. कासर्ले करत आहेत.
…….
गळफास घेऊन महिलेने आत्महत्या
नाशिक – राहत्या घरात गळफास घेत महिलेने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१५) सायंकाळी पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरात उघडकीस आली. शितल भारत मगरे (२८, रा. सितागुंफाजवळ, पंचवटी, मुळ रा. चंद्रमणी नगर, मालेगाव) असे आत्महत्या करणार्या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शेजारी असलेल्या कारखान्यातील मशिन तपासणीसाठी कामगार दुसर्या मजल्यावर गेला असता खिडीकीतून त्यास शितले मगरे यांनी राहते घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरिक्षक यु. आर. गावळी करत आहेत.
……
बांधकामवरून पडून मजुर ठार
नाशिक – बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१५) दुपारी सातपूरच्या अशोकनगर परिसरात घडली.
सिकंदर सिंग (५०, रा. अशोकनगर, सातपूर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इतारतीवर सिंग हा मजुरी काम करत होता. तिसर्या मजल्यावरून तोल जाऊन तो थेट खाली कोसळला. गंभीर जखमी सिंग याचा खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करत आहेत.
…….