भाडेकरुला शिवीगाळ व मारहाण
नाशिक – गंगापूर रोड येथील नवकार सोसायटी घरमालकांचे स्वताच्या घरात राहत असलेल्या भाडेकरुशी झालेल्या वादात घराचा दरवाजा तोडून काचा फोडल्या. याप्रकरणी भाडेकरुच्या तक्रारीवरुन घरमालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राजीव शरद काळे (वय ६०, अद्वैत कॉलनी, कॅनडा कॉर्नर, संजय लक्ष्मण बोबडे (वय ४५, सातपूर कॉलनी) अंबादास रघुनाथ भालेराव (वय ४२, महादेववाडी सातपूर) अरुण सोमाजी बच्छाव प्रबुध्दनगर लक्ष्मण मोगल लोखंडे महादेववाडी सातपूर अशी संशयितांची नावे आहे. याप्रकरणी अभिजीत आनंदीलाल वर्मा (वय ४५, नवकार मेडोज लेन गंगापूर रोड) यांच्या तक्रारीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी अभिजित वर्मा हे संशयित राजीव काळे यांच्या घरात भाड्याने रहायला आहे. काल रविवारी (ता.१८) सकाळी अकराच्या सुमारास संशयित चार पाच जणांसह घरी आले तर त्यांनी प्लॅटचा मुख्य दरवाजा गच्चीतील लोखंडी ग्रीलचा काचेचा दरवाजा लोखंडी पहारीने तोडण्याचा प्रयत्न केला. दरवाजाची काच फोडली. त्यात, वर्मा यांच्या हाताला लागून जखम झाली संशयितांनी शिवीगाळ करीत पत्नीचा विनयभंग केला असेही तक्रारीत म्हटले आहे.
जुन्या वादातून तिघांची एकाला मारहाण
नाशिक – मुंबई नाका परिसरात कालिका मंदीरामागे जुन्या वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी राजेश अर्जुन गांगुर्डे (वय २१, म्हाडा सहवासनगर) यांच्या तक्रारीवरुन सुनील उर्फ सोन्या छबु निकम (वय ३२, सहवासनगर), नितीन गणेश राऊत (वय ३२, बजरंगवाडी) तेजस बाळु टोंगारे (वय २४, राहूलनगर तिडके कॉलनी), यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, फिर्यादी राजेश गांगुर्डे आणि सुनील निकम व इतर संशयित परस्परांचे परिचित आहे. त्यांच्यातील जुन्या भाडंणातून वाद झाले त्यातून रविवारी (ता.१८) सायंकाळी सहाला तिघांनी बेदम मारहाण केली. तेजस टोंगारे यांनी डोक्यात धारदार हत्याराने वार केला.
गंगापूर रोडला मारुतीच्या धडकेत एक जखमी
नाशिक – गंगापूर रोडला मॅरेथॉन चौकात मारुती सुझुकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. याप्रकरणी रोहीत संजय लोळगे (ओम सोसायटी हिरावाडी पंचवटी) यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी गंगापूर रोड वरील मॅरेथॉन चौकात शनिवारी (ता.१७) साडे नऊच्या
सुमारास मयुर संजय लोळगे हा त्यांच्या ताब्यातील पॅशन प्रो मोटारसायकल (एमएच १५ ईयु ८६९८) हिच्यावरुन मॅरेथॉन चौकातून गंगापूर सिग्नल दिशेकडून अशोक थांब्याकडे जाणाऱ्या निळ्या रंगाचे मारुती सुझुकीने धडक दिल्याने मयुर जखमी झाला