लॅम रोड मार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
नाशिक – लॅम रोड मार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. शनिवारी (ता.१७) रात्री पावने अकराच्या सुमारास हा अपघात झाला त्यात,प्रशांत अशोक आहेर, समतानगर व रतन दगडू तेलोरे व विठ्ठल उगले से तिघे जखमी झाले. याप्रकरणी प्रमोद अशोक पवार (भैरवनाथनगर संसरीगाव यांच्या तक्रारीवरुन रतन दगडू तेलोरे (वय ४५, पाथर्डी फाटा ) यांच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, रतन दगडू तेलोरे (वय ४५, पाथर्डी फाटा) त्याच्या ताब्यातील सिलेरियो कार (एमएच १५ जीएल ३४९६) ही संसरी नाका येथून नाशिक रोडला जात असतांना लॅमरोड मार्गावरील भाटीया थांब्याजवळ
दुचाकी (एमएच १५ डीएफ १६३७) हिला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील प्रशांत आहेर, विठ्ठल उगले या दोघांसह रतन तेलोरे हेही जखमी झाले.
…
विहीतगाव स्मशानभूमीत गांजा ओढणारे जेरबंद
नाशिक – नाशिक रोडला विहीतगाव परिसरातील वालदेवी नदी तिरावरील स्मशानभूमीत शनिवारी (ता.१७) रात्री सव्वा आठला गांजा ओढणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. बाळा उर्फ प्रविण मच्छिंद्र डोके (वय ३१, हांडोरे मळा) विशाल अमर सावंत (वय ३५ देवळाली गाव) अशी गांजा ओढणाऱ्यांची नाव आहेत. त्यांच्या विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
…
तडीपार गजाआड
नाशिक – शहर पोलिसांनी हद्दपार केल्यानंतरही शहरातील फुलेनगर फिरत असलेल्या सराईताला पोलिसांनी अटक केली. गणेश तानाजी दातीर (वय २८, कालिका नगर फुलेनगर पंचवटी) असे तडीपार सराईताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात मारामाऱ्या दहशतीसह विविध प्रकारचे पाच ते सहा गुन्हे दाखल आहे. पोलिस उपायुक्तांनी ३ ॅआॅक्टोबर २०१९ ला शहर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. असे असतांनाही शहरात मिळून आला