निफाड – नांदूर्डी परिसरात तीन दिवसांपूर्वी सापडलेल्या अनोळखी महिलेच्या खुनाची उकल झाली असून मृत महिला ही उत्तर प्रदेश येथील असून प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या खुनाच्या गुन्ह्यात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत निफाड पोलिसांनी अधिक माहिती दिली, १५ जुलै रोजी नांदूर्डी शिवारात पालखेड डाव्या कालव्याच्या भरावात एका महिलेचे प्रेत आढळून आले होते. पोलिसांनी याबाबत मृत महिलेचे फोटो प्रसार माध्यमावर प्रसारित केल्यानंतर गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित खुन्याचा शोध घेतला असून गुन्ह्याची कबुली दिली आहे.
संशयित रवी ब्रिजलाल अग्रवाल रा सिद्धार्थ नगर उत्तर प्रदेश याने पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली त्यानुसार मृत महिला ही मुस्लिम समाजाची असून तिचे आरोपीचा भाऊ लाला उर्फ सुभाष अग्रवाल रा सिद्धार्थ नगर उत्तर प्रदेश याच्याशी प्रेम संबंध होते,या दोघांनी लग्न केले तर समाजात बदनामी होईल म्हणून रवीची आई सवारीदेवी हिने या दोघांना उत्तर प्रदेश येथून गोड बोलून रानवड येथे आणले,आणि लाला याला मोटारसायकल घेण्यासाठी पुणे येथे १४ रोजी पाठवून दिले. त्याच रात्री रवी याने मृत महिला हिला गावात फिरून येऊ असे सांगत मोटारसायकलवर आईसह टिबल सीट बसवले. रानवड करखान्याजवळ गाडी थांबवली येथे रवीने पाठीमागून तिचे हात धरले तर स्वातीदेवी हिने मृत महिलेचा गळा दाबून खून केला. त्यानंतर रवी याचा मित्रा मुमताज खान शमशुल्ला याच्या मदतीने सदर महिलेचा मृतदेह नांदूर्डी शिवारात पालखेड बंधाऱ्याच्या शिवारात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दोन दिवस तपासाची चक्रे फिरवून रवी अग्रवाल,मुमताज शमशुल्ला या दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिसरी संशयित आरोपी स्वातीदेवी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीत पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, पोलीस निरीक्षक आर बी सानप,अमोल पवार ये एस आय निकम माळी पोलीस नाईक निचळ घोलप कॉन्स्टेबल आहेर बिडगर सोनवणे राठोड मनोर स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय वाघ गोसावी,हवालदार,मंडलिक,गिलबिले,वानखेडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
मंडलिक,गिलबिले,वानखेडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.