एटीएममधून महिलेचा मोबाईल लंपास
नाशिक – महापालिकेच्या राजीव गांधी भवनसमोरील एटीएम केंद्रातून पैसे काढतांना चोरट्यांनी महिलेचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी मृदला विनोदकुमार भाटीया यांच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काल शनिवारी (ता.१७) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मृदला भाटीया एचडीएफसीच्या एटीएम मधून पैसे काढत असतांना चोरट्यांने त्यांचा सॅमसंग ब्लू रंगाचा मोबाईल चोरुन नेला.
जुन्या भांडणातून सिडकोत एकाला मारहाण
नाशिक – सिडकोतील संभाजी स्टेडीयममध्येजून्या भांडणातून तिघांनी एकाला क्रिकेटच्या स्टम्पने मारहाण केली. याप्ररणी दीपक विजयप्रकाश मिश्रा (वय २४, सह्याद्री सिडको) याच्या तक्रारीवरुन वैभव शिंगाडे, अक्षय पाटील यांच्यासह इतरविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता.१६) संभाजी स्टेडीयममध्ये दुपारी साडे चारच्या सुमारास विल्होळी येथील अनमोल हॉटेलमध्ये झालेल्या जून्या भांडणाच्या वादाची कुरापत काढून वैभव शिंगाडे व अक्षय पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून लाकडी बॅट, स्टंपने दीपक मिश्रा याला बेदम मारहाण केली.
जुन्या वादातून कोयत्याने वार
नाशिक – आगरटाकळी परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून एकावर कोयत्याने वार करण्यात आले. ओंकार सुर्यवंशी असे संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी (ता.१६) दहाच्या सुमारास अमोल अच्युतराव पाईकराव (वय २८, सोनवणे बाबा चौक, टाकळी ) हा टाकळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलजवळ त्या भागातील एका हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता. त्यावेळी संशयित ओंकार याने पाच सहा महिन्यापूर्वी झालेल्या वादाचे कारण काढून शिवीगाळ व दमदाटी करीत, कोयत्याने त्याच्या दंडावर वार केला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.