पंचवटीत बॉलगेम जुगाऱ्यावर गुन्हा दाखल
नाशिक – पंचवटीत इंद्रकुंड मंदीराशेजारील एका रुममध्ये बॉलगेम जुगार खेळणाऱ्या चौघांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णा उर्फ अनिल रंगनाथ आहिरे (वय ४२, पंचशीलनगर गंजमाळ), विवेक त्र्यंबक आंधळे (वय २१, वाल्मीकनगर, पंचवटी), राजेश अनिल सोनवणे (वय २१, लक्ष्मणनगर गायत्रीमंदीर पेठ रोड), आणि राज अजय कोळेकर (वय १९, वाल्मीकनगर पंचवटी ) अशी संशयितांची नावे आहे. शनिवारी (ता.१७) दुपारी साडे तीनच्या सुमारास संशयित बंद खोलीत बॉल गेम जुगार खेळत असल्याने त्यात, ३२०० रुपयांसह मुद्देमाल जप्त करीत,त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
….
एकाच्या घरात देशी दारुचे दहा बॉक्स जप्त
नाशिक – पंचवटीतील तेलंगवाडीत एकाच्या घरात पोलिसांनी देशी दारुचे दहा बॉक्स जप्त केले. अनिल हनुमंत जाधव (वय ४०, तेलंगवाडी, पेठ रोड ) असे संशयितांचे नाव आहे. शनिवारी (ता.१७) सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी विना परवाना देशी संत्रा दारुचे दहा बॉक्ससह १९६ दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी घरात अवैधपणे देशीदारु बाळगल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
….
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
नाशिक – पेठ रोडवरील राहु चौकात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. याप्रकरणी दुचाकीस्वाराच्या तक्रारीवरुन म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार शुक्रवारी (ता.१६) रात्री साडे आठच्या सुमारास पेठ रोड वरील राउ चौकातून आलेल्या ट्रक (एमएच ४६ पीएफ ३६२५) ने समोरुन येणाऱ्या दुचाकी (एमएच १५ सीवाय ७६५६) हिला जोरदार धडक दिल्याने त्यात, भारत काशीनाथ गावीत (वय ३८, अंबाने राज पाडा (ता.दिडोंरी) हा जखमी झाला. त्याच्या तक्रारीवरुन बबलू विश्राम पवार (सागर सितामहू जि.मंडूसर मध्यप्रदेश) याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.