सिडकोत महिलांचा विनयभंग
नाशिक : फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन महिलांचा एकाने विनयभंग केल्याची घटना सिडकोतील सिम्बॉयसिस कॉलेज भागात घडली. अश्लिल हावभाव करीत संशयीताने विनयभंग केला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुलत बहिणी असलेल्या पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरूवारी (दि.१५) दोघी बहिणी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. सिम्बॉयसिस कॉलेज ते एसव्हीसी बँकेसमोरून महिला पाथर्डी फाट्याच्या दिशेने पायी जात असतांना पाठीमागून पळत आलेल्या ३० ते ३५ वयोगटातील इसमाने विनयभंग केला. पांढरा टी शर्ट व बरमुडा पॅण्ट परिधान करून पाठीमागून पळत आलेल्या संशयीताने महिलासमोर जावून अश्लिल वर्तन केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बेडवाल करीत आहेत.
….