गॅलरीतून पडल्याने अल्पवयीन मुलीचा मृत्यु
नाशिक : चौथ्यामजल्यावरील गॅलरीतून पडल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यु झाला. ही घटना सदाशिवनगर भागात घडली होती. गेली पंधरा दिवस सदर मुलगी मृत्युशी झुंज देत होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. ऋतुजा किरणकुमार खंडारे (रा.जनक प्राईड,सदाशिवनगर) असे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यु झालेल्या मुलीचे नाव आहे. ऋतुजा गेल्या गुरूवारी (दि.१) चौथ्या मजल्यावरील आपल्या घराच्या गच्चीतून तोल जावून पडली होती. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने कुटुंबियांनी तिला मुंबईनाका भागातील नारायणी हेल्थ केअर या हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. गेली पंधरा दिवस तिच्यावर उपचार सुरू असतांना तिचा मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.
….