प्रियकराकडून प्रेयसीचा विनयभंग, गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : प्रेमप्रकरण थांबविल्याने संतप्त तरूणाने वाटेत उभ्या असलेल्या प्रेयसीचा विनयभंग केल्याची घटना बारदाण फाटा भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. अजिज सईद शेख (रा.वडाळागाव) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बारदान फाटा भागातील १९ वर्षीय तरूणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयीत व तक्रारदार यांच्यात काही महिन्यांपर्यंत प्रेमसंबध होते. मात्र संशयीत प्रियकराने तरूणीचे लग्न मोडल्याने त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. शनिवारी (दि.१७) सकाळच्या सुमारास युवती आपल्या कामावर जाण्यासाठी बारदाण फाटा येथे अॅटोरिक्षाची प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली. दुचाकीवर आलेल्या तरूणाने तिला गाठून भररस्त्यात विनयभंग केला. अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत.
…
महिलेचा विनयभंग, पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : लहान बहिणीचा विवाह मोडण्याची धमकी देत एकाने २२ वर्षीय महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. रोहन राजेंद्र साळवे (२१ रा.राजवाडा,वडाळागाव) असे संशयीताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेच्या बहिणीशी संशयीताचे प्रेमसंबध आहेत. गेल्या शुक्रवारी (दि.९) महिला आपल्या अंगणात उभी असतांना संशयीत तेथे आला व त्याने आपल्या प्रियशीबाबत विचारपूस केली. यावेळी पीडितेने बहिण घरात नसल्याचे सांगून माझ्या बहिणीला पून्हा भेटू नको व कुठलेही संबध ठेवू नको असा सज्जड दम भरल्याने संतप्त संशयीताने तिला शिवीगाळ करीत हे कृत्य केले. तुझ्या बहिणीचे लग्न होवू देणार नाही असे म्हणत संशयीताने महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चोपडे करीत आहेत.
……
परबनगरला एकाची आत्महत्या
नाशिक : परबनगर भागातील ५४ वर्षीय इसमाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अनिल सोनू क्षिरसागर (रा.अत्रीपुजन अपा.परबनगर) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. क्षिरसागर यांनी मंगळवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील हॉलमधील लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याबाबत मुलगा सागर क्षिरसागर याने दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार निकम करीत आहेत.