कारखान्यात कामगाराची आत्महत्या
नाशिक : रात्रपाळीसाठी कामावर आलेल्या कामगाराने कारखान्यातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना औद्योगीक वसाहतीत घडली. सदर कामगाराच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शशिकांत संतू उनवणे (५५ रा.प्रशांतनगर,पाथर्डी फाटा) असे आत्महत्या करणा-या कामगाराचे नाव आहे. उनवणे औद्योगिक वसाहतीतील विर इलेक्ट्रो इंजिनिअरींग प्रा.लि. या कारखान्यात नोकरीस होते. मंगळवारी (दि.१३) रात्री ते कामावर आले होते. मध्यरात्री अज्ञात कारणातून त्यांनी कारखान्यातच गळफास लावून घेत आत्महत्या केली. व्यवस्थापनाने दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
…..