अंबडला गांजा सेवनावरुन एकावर गुन्हा
नाशिक – अंबड गाव बसथांबा परिसरात गांजा ओढणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करीत, एकाला अटक केली. संदीप राजाराम महाले (वय २०) असे युवकाचे नाव आहे. शनिवारी (ता.१०) दुपारी चारला अंबडगाव बस थांब्याजवळील झोपडपट्टी परिसरात तो गांजा ओढत असल्याचे आढळून आल्याने पोलिस नाईक नितीन छबू भालेराव यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
…..
उघड्या दरवाजातून मोबाईलची चोरी
नाशिक – इंदिरानगर परिसरातील खोडे मळा येथील चिंतामण कॉलनीत उघड्या घरातून चोरट्यांनी मोबाईल लांबविला. याप्रकरणी पुंजाराम शाहू जाधव (वय ३६, चार्वाक चौक इंदिरानगर) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. जाधव यांच्या तक्रारीनुसार, २९ मे रात्री अडीचच्या सुमारास ते घराचा दरवाजा उघडा ठेउन झोपले असतांना रात्रीतून चोरट्याने घरात प्रवेश करीत, घरातील विव्हो आणि ओपो कंपनीचे दोन मोबाईल चोरले. लोखंडी कपाटाचे दार उघडून चोरटा मोबाईल चोरीत असतांना जाग आल्याने चोरटा पळून गेला.