जुन्या वादातून एकाला मारहाण
नाशिक – नाशिकरोडला पळसे साखर कारखाना मार्गावरील आर्शिवाद हॉटेल परिसरात जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सोमनाथ राजाराम गायधनी (वय ३८, सोमय्यानगर, नाशिक कारखाना रोड) यांच्या तक्रारीवरुन लहू काळे, बबलू काळे व त्यांचा जावई नाव पत्ता माहीती नाही. यांच्या विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ गायधनी यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी (ता.१०) सकाळी नऊच्या सुमारास कारखाना मार्गावरील आर्शिवाद हॉटेल परिसरात मागील भांडणाची कुपात काढून बबलू काळे यांने शिवीगाळ करीत, लाथा बुक्यांनी मारहाण केली. तेथे दिलीप गायधनी, संजय ढेरिंगे, अजिंक्य गायधनी हे भांडण सोडवायला आले असता, त्यांनाही लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली.
……
दुचाकी चोरीला
नाशिक – नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून ४ जुलैला दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात जितेंद्र झगा खैरनार (वय २८, जउळके, ता.दिंडोरी) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. खैरनार यांनी त्यांची होंडा शाईन (एमएच १८ एएस ४९२०) हि ४ जुलैला जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्ड रुम परिसरातील पार्किंगमध्ये लावली असताना चोरट्याने चोरुन नेली. दुसरा प्रकार मुंबई नाका परिसरातील हॉटेल छान परिसरात उघडकीस आला. निखील गजानन शेलार (वय ३८, कमोद रोड जुने नाशिक) यांनी त्यांची दुचाकी ॲक्टीव्हा (एमएच १५ एनएच २३३३) ही मुंबई नाका परिसरातील छान हॉटेल परिसरात पार्क केली असता, ५ जुलैला अकराच्या सुमारास हॉटेलच्या गेटसमोरुन दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी काल शनिवारी (ता.१०) मुंबई नाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
…..