शिवीगाळ करत विनयभंग
नाशिक : घरासमोर येवून शिवीगाळ का करतोस ? अशी विचारणा केल्याचा राग आल्याने एकाने महिलेचा हात पकडून विनयभंग केला. बुधवारी (दि. ७) कृषीनगर जॉगींग ट्रक परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पिंटू उर्फ लक्ष्मण निवृत्ती ताठे (वय ३५, रा. कृषीनगर जॉगींग ट्रकजवळ) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास संशयित पिंटू ताठे हा पीडितेच्या घरासमोर आला व शिवीगाळ करून लागला. त्यामुळे पीडितेने त्यास जाब विचारला. त्याचा राग आल्याने संशयिताने पीडितेचा हात पकडून जवळ ओढत विनयभंग केला. यावेळी पीडितेचे शेजारी वाद सोडवण्यासाठी आले असता संशयिताने त्यांनाही शिवीगाळ व मारहाण केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितास अटक केली. याप्रकरणी हवालदार पी. जी. भूमकर तपास करत आहे.
….
घरात शिरून मारहाण
नाशिक : घरात प्रवेश करत दोन संशयितांनी एकास शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी सुनिल रमेश धोत्रे (रा. पेठरोड) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष संपत माने, विलास रामू धोत्रे (दोघे रा. फुलेनगर) अशी संशयितांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि. ८) सकाळी दोघे संशयित संगनमत करून फिर्यादीच्या घरात घुसले. यातील संतोष माने हिस्याचे ८०० ते हजार रुपये का दिले नाही अशी विचारणा करत शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच दररोज हजार रुपये आणून दिले नाही तर गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी दोघा संशयितांना ताब्यात घेत्लो. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. जी. डंबाळे तपास करत आहे.