आर्टिलर सेंटर रोड येथे सॅनिटायझर सेवन करून एकाची आत्महत्या
नाशिक – कोरोनामुळे आता घरोघरी सॅनिटायझर प्रादुर्भाव रोखण्यासाठी केला जातो. पण, नााशिकरोड येथील आर्टिलर सेंटर रोड येथे एकाने राहत्या घरी सॅनिटायझर सेवन करून आत्महत्या केली. संदिप ईश्वर कुलर्थ (४१, ) असे आत्महत्या करणार्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कुलथे यांनी गुरूवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास राहते घरी सॅनिटायझर सेवन केले. त्यांना त्रास होऊ लागल्याने तातडीने बिटको रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून घोषीत केले.
……..
कार अपघातात तिघे जखमी, दुसरा कारचालक मदत न करता निघून गेला
नाशिक – मखमलाबाद शिवारात भरधाव कारने दुसर्या कारला धडक दिल्यामुळे कारमधील तीघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेत धडक देणार कारचालक मदत न करता भरधाव वेगाने निघून गेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
ही घटना बुधवारी (दि.२८) रात्री घडली. आकाश दिपक सुर्यवंशी(रा. जाधवमळा, हनुमानवाडी, पंचवटी), प्रसाद विरकर , कुणाल सुर्यवंशी (दोघे रा. महात्मानगर) अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. सुर्यवंशी याने दिलेल्या तक्रारीनुसार तीघे मित्र स्विफ्ट कार क्र. एमएच १५८१६५ मधून मखमलाबादकडून नाशिककडे येत असताना स्वामी समर्थ केंद्राजवळ समोरून भरधाव आलेली पांढर्या रंगाची स्विफ्ट कार क्र. एमएच १५ सीटी ०३५६ या गाडीने त्यांना समोरून डाव्या बाजुस जोराची धडक दिल्याचे म्हटले आहे.
…….
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणींनी केल्या आत्महत्या
नाशिक – शहरात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरूवारी (दि.२९) रात्री विविध दोन घटनांमध्ये दोन युवतींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शुभांगी ज्ञानेश्वर बागुल (२४, रा. माणिकनगर, नवीन नाशिक) असे आत्महत्या करणार्या मुलीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभांगी हिनेे गुरूवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास राहते घरी फॅनच्या हुकला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. दुसरी घटना नवीन नाशिकच्या महाराणा प्रताप चौक परिसरात घडली. येथील भाग्यश्री संतोष वायदंडे (२२) हिने गुरूवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास राहते घरी पत्र्याच्या पाईपला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पुर्वीच तीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून घोषीत केले. या दोन्ही प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
……..