श्रीरामनगरला तरूणीची आत्महत्या
नाशिक : महामार्गावरील श्रीरामनगर भागात राहणा-या २२ वर्षीय युवतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. तरूणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोद करण्यात आली आहे. नुतन भुषण नवले (रा. प्रकृती पार्क,श्रीरामनगर) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. नुतन नवले हिने सोमवारी (दि.५) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ आडगाव मेडिकल कॉलेज येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तिला मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार ढिकले करीत आहेत.
….
चैनस्नॅचिंगच्या प्रयत्नात दोघे चोरटे जेरबंद
नाशिक : चैनस्नॅचिंगच्या प्रयत्नातील मुंबईच्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. वृध्दाच्या प्रसंगावधनामुळे संशयीत पोलीसांच्या हाती लागले असून, त्याच्या ताब्यातून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद हुजैफा जमीर खान (१९ रा.सायन,मुंबई) व ताबीश फैयाज खान (२३ रा.धारावी,मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीत चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी सतीष मधुकर पवार (५७ रा.गोडसेमळा,आनंदरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवार सोमवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास परिसरात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. सत्यम शिवम सोसायटी नजीक ते रस्त्याने पायी आपल्या घरी जात असतांना पाठीमागून येणा-या दोघा भामट्यांनी त्यांच्या गळयातील ५५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी ओरबाडण्याचा प्रयत्न केला. पवार यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड करून भामट्यांशी झटापट केली. स्थानिकांनी वेळीच पवार यांच्या मदतीला धाव घेतल्याने संशयीत पोलीसांच्या हाती लागले असून अधिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.
….