नोकरदार महिलेस साडे सात लाखांचा गंडा
नाशिक : विविध योजनांचे आमिष दाखवून भामट्यांनी एका नोकरदार महिलेस तब्बल साडे सात लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. विविध बँकाच्या युपीआय आयडीवर ही रक्कम भरण्यास भाग पाडण्यात आले असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शम्मी गिरीश शेट्टी (रा.मोटवाणी रोड,ना.रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेट्टी या नोकरदार असून गेल्या मे महिन्यात त्यांना ८५२६८५९८७०० या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला होता. यावेळी भामट्यांनी त्यांना मोबाईलवर एक अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. तसेच अल्पवेळेत कमी गुंतवणुकीवर जास्त मोबदला मिळेल अशा व विविध प्रकारच्या योजनाची माहिती देत त्यांना एसबीआय,अॅक्सीस आणि पीएनबी सारख्या अनेक बँकाच्या युपीआय आयडी वर रक्कम भरण्यास भाग पाडले. या काळात शेट्टी यांनी विविध बँकाच्या माध्यमातून साडे सात लाख रूपये भरले. त्यानंतर संबधीताशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच शेट्टी यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक देवराज बोरसे करीत आहेत.
…..