संजीवनगरला १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या
नाशिक : अंबड लिंक रोडवरील संजीवनगर भागात राहणा-या १४ वर्षीय मुलीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. श्रध्दा संजय सिंग (१४ रा.ओम हाईटस,संजीवनगर) असे आत्महत्या करणा-या मुलीचे नाव आहे. श्रध्दा सिंग हिने रविवारी (दि.४) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकाला आोढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी पिंटू सिंग यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
….