अल्पवयीन मुलाची आत्महत्या
नाशिकः राहत्या घरी १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२८) सायंकाळी गंगापुररोडवरील पारिजात नगर येथे घडली. योजीत शैलेश पाटील (१५, रा. साई अव्हेन्यु सोसायटी, समर्थनगर, पारिजातनगर, गंगापूर रोड) असे आत्महत्या करणार्या मुलाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार योजीत याने बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास राहते घरातील जीमच्या रॉडला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यास तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. जाधव यांनी तपासून घोषीत केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
…..