आॉफिस फोडून रोकडसह डेअरी प्रॅाडक्ट चोरी
नाशिक : वितरकाचे ऑफिस फोडून चोरट्यांनी रोकडसह डेअरी प्रॅाडक्ट चोरून नेल्याची घटना राजीवनगर भागात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक दिलीप आव्हाड (रा.गंगापूर रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. आव्हाड यांचे राजीव नगर येथील सुमन पेट्रोल पंपा मागे पॉवर डेअरी लिमीटेड नावाचे कार्यालय आहे. या ठिकाणाहून किरकोळ विक्रेत्यांना डेअरी प्रोडक्ट आणि तूप डब्यांचा पूरवठा केला जातो. शनिवारी (दि.३)अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या मागील पत्रा उचकटून ही चोरी केली. कार्यालयात शिरलेल्या भामट्यांनी गल्यातील रोकड, डेअरी प्रॅाडक्ट आणि तुपाचे डबे असा सुमारे १ लाख ८५ हजार ८६४ रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.
…..