राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांवर गुन्हे
नाशिक – शहरात जमावबंदी असतानाही महागाई विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष तसेच इतर अशा ७० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राज्य कार्यकारणी सदस्य दिलीप खैरे, अंबादास खैरे, बाळासाहेब कर्डक, दुसर्या आंदोलनात गजानन शेलार, सागर चौथेपाटील, शरद महाले, शिवाजी चौधरी यांच्यासह सुमारे ७० पदाधिकार्यांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या निष्कर्यतेमुळे देशभरात इंधन दरवाढ होत असल्याने महागाई वाढत आहे. याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास उपनिरिक्षक बैरागी करत आहेत.
…..
शौचालयाच्या छतावरून पडून एक ठार
नाशिक – मद्याच्या नशेत घराजवळली सार्वजनिक शौचालयाच्या छतावर जाऊन बसलेल्या युवकाचा तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाल्याची घटना मल्हारखान परिसरात गुरूवारी (दि.१) रात्री घडली. संजय जयराम गाडर (३२, रा. मल्हारखान, गंगापुर रोड) असे या घटनेत मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडर हा मद्यधुंद अवस्थेत घराजवळील सार्वजनिक शौचालयाच्या टाकीवर जाऊन बसला होता. तो जाऊन तो खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने जिल्हा रूग्णालय येथे दाखल करण्यात आले परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
….