नाशिक – रामकुंडावर गांधी तलावातील चार बोटी जाळपोळ प्रकरणात पोलिसांनी चार जणांच्या मूसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या घटनेत विकास मंगेश व्यवहारे उर्फ पिठल्या, (वय २७, रा-बालाजी नगर, भांडेबाजार,गंगाघाट, पंचवटी) अजय बाळु जाधव उर्फ भैयटया, (वय २४, रा- पिंगळेमळा, दरी-मातोरी,), अक्षय हिरामण जाधव (,वय २४,गंगाघाट, पंचवटी,) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या सर्वांची कसोशीने चौकशी केल्यानंतर त्यांचा साथीदार आकाश प्रभाकर मोहीते यांनी संगनमताने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
या कारणाने केली जाळपोळ
संशयित विकास मंगेष व्यवहारे उर्फ पिठल्या, याचा फिर्यादी सोबत गंगाघाट येथे लिंबू सरबतची हातगाडी लावण्याचे कारणावरून वाद झाला होता. तसेच अजय बाळु जाधव उर्फ भैय्या हा पोलीसांचा खबरी असून गंगाघाटावरील सर्व माहिती पोलीसांना देतो असा गैरसमज करून फिर्यादीने गुन्हा घडण्यापूर्वी दमदाटी केली. यावेळी त्याने पाहून घेण्याची धमकी दिली होती. त्याचा राग मनात धरून संशयीतांनी संगनमताने चार बोटींवर पेट्रोल ओतून त्यास आग लावून दिल्याचे उघडकीस आले.
असा लावला तपास
पोलीस निरीक्षक अशोक भगत व पोलीस निरीक्षक(गुन्हे) अशोक साखरे यांच्या मार्गदशनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार व पोलीसानी संवेदनशील गुन्हयातील आरोपींचा कोणताही ठावठिकाणा नसतांना मागील तीन महिन्यापासून कौशल्यपुर्ण पध्दतीने मानवी व तांत्रिक साधनांचा वापर करून तपास लावला. पथकाचे पोलिस शिपाई राकेश शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरून हा गुन्हा उघडकीस आला.