पत्नीवर कात्रीने हल्ला पतीस अटक
नाशिक : कौटूंबिक कारणातून पतीने पत्नीवर धारदार कात्रीने हल्ला केल्याची घटना भारतनगर भागात घडली. याघटनेत पत्नी जखमी झाली असून पतीस पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शेहनाज अब्दूल शेख (२३ रा.मराठी शाळेजवळ,शिवाजीवाडी) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी खुशबू शेख यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख दांम्पत्यामध्ये कौटूंबिक कारणातून गुरूवारी (दि.१) वाद झाला होता. यावेळी संतप्त संशयीताने धारदार कात्रीने आपल्या पत्नीवर हल्ला केला. याघटनेत पत्नीच्या डोक्यात व पायावर वार करण्यात आल्याने ती जखमी झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.
..
चांदगिरी येथे तरूणाची आत्महत्या
नाशिक : चांदगिरी ता.जि.नाशिक येथील ३२ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
दशरथ उर्फ वाळू पुंडलिक हांडगे असे आत्महत्या करणा-या तरूणाचे नाव आहे. दशरथ हांडगे याने गुरूवारी (दि.१) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी लखन कटाळे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास अंमलदार गांगुर्डे करीत आहेत.
….
देवळाली कॅम्पला दुचाकी चोरी
नाशिक : महाविद्यालय परिसरात पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना भाटीया कॉलेज परिसरात घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश गणपत बोराडे (रा.पिंपळगाव खांब,चिंचवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. बोराडे ५ एप्रिल रोजी देवळाली कॅम्प येथे गेले होते. भाटीया महाविद्यालयाच्या भिंती लगत त्यांनी आपली दुचाकी (एमएच १५ डीबी ६५०२) पार्क केली असता चोरट्यांनी चोरून नेली. अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.