पत्नीस मुल होत नसल्याने लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार, बलात्काराचा गुन्हा दाखल
नाशिक – पत्नीस मुल होत नसल्याने लग्न करण्याचे अमिष दाखवत एकाने युवतीवर तीन वर्षांपासून वेळोवेळी अत्याचार केल्याचे तसेच पत्नी व इतर महिलेच्या मदतीने गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला आहे. शांताराम सुकदेव भालेराव, सुनिता शांताराम भालेराव, दिक्षा दिलप हुसळे (रा. सर्व टॅ्रक्शन गेट, एकलहरा, माळी कॉलनी) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित शांताराम याने पत्नीस मुल होत नसल्याने पीडितेस लग्न करण्याचे अमिष दाखवत जुन २०१६ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत वेळोवेळी अत्याचार केले. यातून पीडिता गर्भवती राहिली असता संशयित व त्याच्या पत्नी व हुसळे यांच्या मदतीने तीला जबरदस्तीने दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले. तर अखेरीस लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक पी. डी. माळी करत आहेत.
……