पंचवटीत खंडणीची मागणी
नाशिक – व्यापार्यास मारहाण करत, कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देत टोळक्याने ५० हजाराची खंडणी मागितल्याची घटना पेठरोड भागात घडली. याप्रकरणी पंचवटी. पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशाल चंद्रकांत भालेराव (रा. पंचवटी), गौरव सोनवणे व त्यांचे दोन साथीदार (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी सराईतांची नावे आहेत. या प्रकरणी संदिप सुधाकर पगारे (रा. शनिमंदिरजवळ, पेठरोड, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पगारे हे मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रा समवेत घराच्या मागील बाजुस गप्पा मारत उभे असताना सराईत राखाडी रंगाच्या चारचाकी गाडीतून तेथे आले. त्यांनी पगारे यांना शिवीगाळ करत लाकडी दांड्यांणी मारहाण केली. तसेच त्यांच्या घरात घुसून पत्नीस कोयत्याचा धाक दाखवला. तुला भाजी मार्केटमध्ये व्यावसाय करायचा असेल तर आम्हाला दर महिन्याला ५० हजार रूपये खंडणी द्यावी लागेल अशी मागणी केली. तसेच खंडणी न दिल्यास अगर पोलीसांना सांगितल्यास कुटुंबियांना जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल भालेराव या सराईतावर खून, खूनाचा प्रयत्न, मारहाण, दहशत पसरवणे असे विविध गुन्हे पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. अधिक तपास पोलीस निरिक्षक डंबाळे करत आहेत.
……..