टोळक्याकडून महिलेचा विनयभंग
नाशिक : घरात घुसून टोळक्याने जीवंत जाळण्याची धमकी देत व बेदम मारहाण करीत, एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना टोगोरनगर भागात घडली. जुन्या वादातून ही घटना घडली असून, संशयीतांमध्ये तीन महिलांसह दोन पुरूषांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराज नगर भागात राहणा-या पीडित महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत सुजाता हरीदास बर्वे, भालचंद्र भुजबळ, अर्जुन काळे, स्नेहल आणि अन्य एक अनोळखी महिला आदींनी महिलेस मारहाण केली. गेल्या शुक्रवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास पीडित महिला आपल्या घरात एकटी असतांना संशयीत टोळक्याने तिच्या घरात प्रवेश केला. यावेळी मागील भांडणाची कुरापत काढून संशयीतांनी तिला शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी जिवंत जाळण्याची धमकी देत संशयीतांनी विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खडके करीत आहेत.
…..