आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तीघांवर गुन्हा
नाशिक – विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ केल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.२६) पंचवटीतील तुळजाभवानी नगर येथे घडली होती. तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह सासु व सासरे अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती बलराम राजु माचरेकर, सासु विमल माचरेकर, सासरा राजु दिपक माचरेकर (रा. तुळजाभवानीनगर, मार्केटयार्ड जवळ, पंचवटी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गाळ्यासाठी पैसे आणावेत यासाठी पती व सासु – सासर्यांच्या शाररिक व मानसिक छळ सुरू होता याला कंटाळून पल्लवी बलराम माचरेकर (२५) हिने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी तीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती बलराम व सासु सासर्यांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक लिलके करत आहेत.
…..
विजेचा शॉक लागुन एकजण ठार
नाशिक – म्हसरूळ परिसरात इलेक्ट्रीकचे काम करत असताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. विजय नारायण धोंगडे (४७, रा. स्हेन नगर, म्हसरूळ) असे या घटनेत मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळ मधील गुलमोहर नगर, भाग्य लक्ष्मी अपार्टमेंट येथे रविवारी दुपारी धोंगडे हे इलेक्ट्री काम करत असताना त्यांच्या हाताच्या पंजा व छातीला विजेची वायर लागून धक्का बसला. यात गंभीर जखमी झालेल्या धोंगडे यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. परंतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे वैदयकीय अधिकार्यांनी घोषीत केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
…..