गणपती मंदिरात चोरीचा प्रयत्न
नाशिक – गंगापूर रोड येथील गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरीचा प्रयत्न चारेट्यांनी केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. संदिप गंगाराम गाडे (२८, रा. आनंदवली) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी संजय नारायण जोशी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री येथील सावरकरनगर परिसरातील गणपती मंदिराची उत्तर बाजुकडील ग्रील गेट गाडे याने तोडून लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडला. त्याने आत प्रवेश करून दान पेटीचे कुलुप तोडून भाविकांनी टाकलेले पैसे चोरून नेण्याचा प्रयत्न केला. नागरीकांनी त्यास पकडून पोलीसांच्या हवाली केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक मोहिते करत आहेत.
….
७३ हजाराची घरफोडी
नाशिक- बंद घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी सोन्या चांदिचे दागिण्यांसह ७३ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी जेलरोड परिसरात घडली. याप्रकरणी रविंद्र कचरू खरात (४२, रा. ब्रीजनगर, जेलरोड, नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार खरात कुटुंबिय बाहेर गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. दोन्ही मजल्यावरील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या चांदिचे ७३ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक विंचु करीत आहेत.
….