पावणे सात लाखांच्या भंगाराची चोरी
नाशिक – सातपूर येथील एबीबी इंडिया कंपनीतील सुमारे पावणे सात लाखांहून अधिक किमतीच्या भंगाराची चोरी केल्याप्रकरणी चौघांविरोधात पोलीस अंमलदार गोकूळ चंद्रभान कासार यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. साहीद आसिक अली, वनजरुल्लाह खान आणि कंपनीतील सुरक्षा रक्षक व वजन काटा करणारा कर्मचारी अशा चौघा संशयितांपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. सातपूर येथील औद्योगिक वसाहतीतील एबीबी इंडिया साहीद आसिक अली याने जे. के. इंटरप्रायझेजचे मालक जमीरुल्लाह खान यांच्या सांगण्यावरून आयशर टेम्पो (एमएच १५ ईजी १६९८) मध्ये कंपनीतील भंगार हे कंपनीतील सुरक्षा वजन काटा करणाऱ्या व्यक्ती अशा चौघांनी संगनमताने मालाची चोरी करून वजन काटा पावतीत फेरफार करून फसवणूक केली.
…..